Eknath Shinde Latest Speech Video : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा व महापुरुष-संत यांच्या पुतळ्यांचं ई-अनावरण आज बुलढाण्यात झालं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलावर्गाला संबोधित केलं. लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी निशाणा साधला. काँग्रेसच्या लोकांना माझ्या बहिणींचा सुखी संसार बघवत नाही. त्यांना योग्य वेळी माझ्या बहिणी जोडे दाखवतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.