मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, इनकमिंग जोरात आहे!

Video : मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, इनकमिंग जोरात आहे!

Jun 02, 2023 06:14 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jun 02, 2023 06:14 PM IST

मुंबईतील चांदिवली विभागातील उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नानं हा प्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचं पक्षात स्वागत केलं. राज्य सरकारच्या विकासकामांवर विश्वास ठेवून लोक आमच्याकडं येत आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. इनकमिंग जोरात आहे आणि हे पुढंही सुरूच राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp