Eknath Shinde on ganesh chaturthi : 'सर्वजण ज्या उत्सवाची आतुरतेनं वाट पाहत होते, तो गणेश उत्सव सुरू झाला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज म्हणाले. गणराया सर्वांसाठी सुख-समृद्धी घेऊन येवो. बळीराजावरील संकट दूर होवो. शेती चांगली होऊ दे,' अशी प्रार्थना मी गणरायाकडं केल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं आहे. त्याशिवाय, त्यांच्या ठाण्यातील घरी देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. आज त्यांनी सहकुटुंब बाप्पाची पूजा केली.