Eknath Shinde on mumbai rain : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य आपत्ती निय़ंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील विविध भागातील पावसाची माहिती घेतली. महामार्ग, रेल्वे, प्रमुख रस्ते येथील परिस्थितीचा देखील आढावा घेतला. या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. ही एक प्रकारची अतिवृष्टी आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं. नागरिकांच्या मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिली.