Akshay Shinde Encounter : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोप अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय शिंदेच्या घटस्फोटित पत्नीनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्या चौकशीसाठी पोलीस त्याला घेऊन जात होते. त्यावेळी त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला, असं शिंदे व फडणवीसांनी सांगितलं.