Chhagan Bhujbal said on Maratha Reservation Video : मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने आज काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केले. सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही. ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत. लवकरच ओबीसींच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल, अशी भूमिका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज मांडली. अध्यादेश काढल्याचं सरकार सांगत असलं तरी तो अध्यादेश नाही. तो केवळ एक मसुदा आहे. त्यावर हरकती मागवल्या गेल्या आहेत. आम्ही लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवू, असं भुजबळ म्हणाले.