Chhagan Bhujbal Video : राज्यातील काही मंदिरात लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोडवरून सध्या राज्यात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी या निर्णयावर सडकून टीका केली. 'हा ड्रेसकोड म्हणजे मूर्खपणा आहे. तसं असेल तर मंदिरातील उघड्याबंब पुजाऱ्यांनीही सदरा घालावा, असं भुजबळ यांनी सुनावलं. ठराविक कपडेच सगळ्यांनी घालायचे असतील तर देवळात उघडेबंब बसलेले असतात, त्यांनीही काहीतरी सदरा वगैरे घातला पाहिजे. गळ्यात माळ असली की तो पुजारी आहे हे आपल्याला समजेल. ते पुजारीही अर्धनग्न नसतात का?,’ असा प्रश्न भुजबळ यांनी केला.