Chandrakant Patil on devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. माणसानं प्रत्येक पायरी वर चढत जायला हवी. राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचे सर्व गुण देवेंद्र फडणवीस यांच्यात आहेत. केंद्रीय नेतृत्वानं त्यांच्याबद्दल तसा काही विचार केला असेल तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भाषेबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.