येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. देशभरातील हजारो मान्यवरांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात विविध धर्मांच्या संत-महंतांचाही समावेश आहे. बौद्ध भिक्खू भदंत राहुल बोधी महाथेरो यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यांनी स्वत: ही माहिती दिली. मी बौद्ध धर्मीयांचा प्रतिनिधी म्हणून अयोध्येला जाण्याचा प्रयत्न करेन, असं ते म्हणाले.