Chitra Wagh Video : पुण्यातील ससून रुग्णालय ड्रग्स प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास त्यांनी फडणवीसांना गृहमंत्रिपद देऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेला भाजपच्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. राज्याच्या मोठ्ठ्या ताई, सुप्रियाताईंना १०० कोटी रुपयांची वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री त्यांना आवडणार नाहीच. त्यांची चॉईसच वेगळी आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.