Chitra Wagh Video : विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे. एका जुन्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळं संतापलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. तर, दुसरीकडं अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर कटकारस्थानांचे आरोप केले आहेत. या आरोपांना भाजपच्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा खोटं नरेटिव्ह पसरवण्याची सुरुवात झाली आहे. साहेबांची इको सिस्टिम पूर्णपणे अॅक्टिव्हेट झाली आहे, असा टोला वाघ यांनी शरद पवार यांना हाणला आहे.