मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : भास्कर जाधव यांनी जे हेरलं, ते कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं! पाहा काय बोलले!

video : भास्कर जाधव यांनी जे हेरलं, ते कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं! पाहा काय बोलले!

Jun 20, 2024 03:00 PM IST

Baskar Jadhav Speech video : बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन १९ जून २०२४ रोजी पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा साजरा केला. यावेळी पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी खणखणीत भाषण केलं. नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून आल्याचा आरोप भाजपकडून सातत्यानं केला जातो. त्याचा समाचार भास्कर जाधव यांनी घेतला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोदीच काय, भाजपच्या कोणाचाही फोटो बॅनरवर लावला नाही. मात्र, आमच्या बाळासाहेबांचा फोटो भाजपसह राज्यातील सर्व ४८ उमेदवारांच्या बॅनरवर होता, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. त्यामुळं कुणी आमच्या नादाला लागू नका. आम्ही पाच खासदारांचे ९ केले. आमचा स्ट्राइक रेट २०० चा आहे. हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा स्ट्राइक रेट आहे, असं जाधव म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp