Congress leader Atul Londhe on Saamana Editorial : महाविकास आघाडीचं सरकार जाण्यामागे पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तडकाफडकी दिलेला राजीनामा हेही एक कारण होतं. तो शहाणपणाचा निर्णय नव्हता आणि तेव्हापासून सुरू झालेली संकटांची मालिका थांबलीच नाही, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये सर्व निर्णय पक्षश्रेष्ठींशी विचारविनिमय करून घेतले जातात. त्यामुळं शिवसेनेचं हे मत योग्य नाही, असं लोंढे यांनी म्हटलं आहे.