Amol Kolhe on UCC code : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सध्या बीड जिल्ह्यात आहे. या निमित्तानं केजमध्ये पक्षाचा मेळावा झाला. मेळाव्याला मार्गदर्शन करताना खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मुद्द्याचा उल्लेख केला. युनिफॉर्म सिविल कोड म्हणजे समान नागरी कायद्याचा प्रचार करणारे पंतप्रधान आता सेक्युलर सिविल कोडपर्यंत आले आहेत, असं कोल्हे यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेचे पैसे घ्या. कोणी त्यांच्या खिशातून देत नाही. आपल्याच कष्टाचे पैसे आहेत, असं अमोल कोल्हे म्हणाले.