Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभरात जनसन्मान रॅली सुरू केली आहे. या रॅलीचा शुभारंभ अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये झाला. यावेळी भर पावसात सभा झाली. महायुती सरकारनं महिलांसाठी आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा खास उल्लेख केला. या योजनेबद्दल विरोधकांनी आमच्यावर टीका केली. मात्र, आम्ही त्याकडं लक्ष दिलं नाही. या योजनेतून माझ्या माता-भगिनींना १८ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेतून सुमारे अडीच कोटी महिलांना पैसे मिळणार आहेत. रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यावर पहिल्या दोन महिन्यांचे ३ हजार रुपये येतील. मात्र, महायुती सरकार पुन्हा आलं पाहिजे याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. हे सरकार पुन्हा आलं तर ही योजना कायमची सुरू राहील, असं अजित पवार म्हणाले.