Video : आज जागे झाला नाहीत, तर उद्या संधीही मिळणार नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फडणवीसांची जोरदार बॅटिंग
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : आज जागे झाला नाहीत, तर उद्या संधीही मिळणार नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फडणवीसांची जोरदार बॅटिंग

Video : आज जागे झाला नाहीत, तर उद्या संधीही मिळणार नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फडणवीसांची जोरदार बॅटिंग

Updated Jul 22, 2024 07:14 PM IST

Devendra Fadnavis on Hindutva : पुण्यातील बालेवाडी इथं नुकतंच महाराष्ट्र भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन झालं. या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल अपराधबोध बाळगण्याचं काही कारण नाही. आमचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक आहे. कोणत्याही पूजा पद्धतीला आमचा विरोध नाही. प्रभू रामचंद्र व शिवाजी महाराजांना मानणारा प्रत्येक माणूस हिंदू आहे, असं आम्ही मानतो. जगभरातून हुसकावलेल्या लोकांना स्थान देणारा हाच हिंदुस्तान आणि हिंदू आहे. पण आमचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कोणी करणार असेल तर तेही सहन करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp