Virat Kohli at Vrindavan with family Video : बांगलादेश दौऱ्याहून परतल्यापासून टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. नव्या वर्षाचं स्वागतासाठी तो कुटुंबासह दुबईला गेला होता. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विराट हा नुकताच पत्नी अनुष्का शर्मा व मुलगी वामिकाला घेऊन वृंदावनला गेला होता. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या आधी प्रेमानंद गोविंद शरण जी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी विराट तिथं गेला होता, असं सांगितलं जात आहे. विराट व अनुष्का प्रेमानंद महाराजांचे भक्त असल्याचं बोललं जातं. या दोघांचा वामिकासोबतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.