उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरातील विविध वसाहतींमधील रहिवाशांनी त्यांच्या वसाहतींची नावं बदलून 'नरक पुरी', कीचड नगर', घिनोना नगर, बदबू विहार, नाला सरोवर' अशी ठेवली आहेत. रस्त्यांची दुरवस्था, पाणी साचणे अशा विविध समस्यांचा निषेध म्हणून हे अभिनव आंदोलन करण्यात आलं आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.