Video : 'मुंबईला वाचवा! अदानी मुंबई साफ करतोय, विजय वडेट्टीवार विधानसभेत गरजले!
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : 'मुंबईला वाचवा! अदानी मुंबई साफ करतोय, विजय वडेट्टीवार विधानसभेत गरजले!

Video : 'मुंबईला वाचवा! अदानी मुंबई साफ करतोय, विजय वडेट्टीवार विधानसभेत गरजले!

Jul 04, 2024 05:01 PM IST

Vijay Wadettiwar on Mumbai Land Transfer : धारावी पुनर्विकास, कुर्ला येथील दुग्ध विकास विभागाच्या जागेच्या मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज सरकारला घेरलं. 'राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. अदानी सगळी मुंबई साफ करत आहे. मुंबईला अदानीपासून वाचवा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. 'राज्याचे प्रमुख अदानींना पाठीशी घालत आहेत, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. 'कुर्ला येथील दुग्ध शाळेची जमीन साडे आठ हेक्टर आहे. दहा जून २०२४ रोजी एकाच दिवशी ही जमीन पशुसंवर्धन विभाग ते महसूल विभाग ते अदानी यांना हस्तांतरीत केली गेली. हे हस्तांतरण एकाच दिवसात झाले. इतकी तप्तरता कशी, असा सवाल त्यांनी केला. सदर जमिनीचे मूल्यांकन किती आहे? जमिनीवरील एफएसआय चे मुल्याकंन किती होते ? किंमत वीस हजार कोटी रुपये होते तरीही रेडी रेकनरच्या केवळ २५ टक्के दराने जमीन दिली गेली आहे. यावरही विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप घेतला. हस्तांतरणासंदर्भात तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काय शिफारशी केल्या होत्या. तुकाराम मुंडे यांनी दिलेली नोट अनुकूल नव्हती म्हणून त्यांची बदली करण्यात आली का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सगळ्याची चौकशी करून सभागृहाला याबाबतची माहिती द्या, अशी मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडं केली.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp