Prakash Ambedkar Slams Narendra Modi : शिवसेनेतील बंडामुळं राज्यातील राजकीय समीकरणं बदललेली असतानाच आज शिवसेना व वंचित बहुजन आघाडीनं युतीची घोषणा केली. युती करण्याची वेगवेगळी कारण सांगताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीकडंही लक्ष वेधलं. देशातील नेतृत्व हुकूमशाहीच्या दिशेनं चाललेलं आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कोणीही इथं अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. एक दिवस आमचाही अंत होईल आणि मोदींचाही अंत होईल, असं आंबेडकर म्हणाले.