Uddhav Thackeray Video : बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. देशातील निवडणुकांमध्ये बटेंगे-कटेंगे-फटेंगेच्या चर्चा करता, आता बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतायत त्यावर आवाज उठवा, तिथं धमक दाखवा. युक्रेन युद्ध जसं तुम्ही एका फोनवर थांबवलं होतं, तसे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिलं.