Uddhav Thackeray Video : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज पार पडला. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केलं. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्यायालयीन प्रकरणात लवकरची तारीख द्या अशी मागणी करणाऱ्या वकिलांवर सरन्यायाधीश चंद्रचूड भडकले होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली. या जन्मी किंवा पुढच्या जन्मी, आम्हाला न्यायदेवता नक्की पावेल, अशी खोचक टिप्पणी ठाकरे यांनी केली.