Uddhav Thackeray Paithan Speech : छत्रपती संभाजी नगर इथं झालेल्या सभेत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यावर तोफ डागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गणपती दर्शनासाठी चंद्रचूड यांच्या घरी गेले होते. त्यावर ठाकरे यांनी भाष्य केलं. शिवसेनेच्या खटल्याला 'तारीख पे तारीख' मिळण्याचं कारण हेच तर नाही ना, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केली. तारीखच द्यायची असेल तर आम्हाला तुमच्या निवृत्तीनंतरचीच तारीख द्या, म्हणजे तुम्हीही मोकळे आणि आम्हीही मोकळे, असा खोचक टोला ठाकरे यांनी चंद्रचूड यांना हाणला.