Uddhav Thackeray slams bjp : ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा नुकताच पुण्यात पार पडला. या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. अमित शहा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला औरंगजेब फॅन क्लब असं म्हणून हिणवलं होतं. त्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. अमित शहा हे अहमद शहा अब्दालीचे वंशज आहेत. तेही शहाच आहेत, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला. नवाझ शरीफच्या वाढदिवसाचा केक खाणाऱ्यांकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं का, असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपनं देशात 'सत्ता जिहाद' चालवला आहे, असा आरोपही त्यांनी केला.