Uddhav Thackeray on Vanchit Bahujan Aghadi : शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) 'आवाज कुणाच्या' या पॉडकास्टला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला. त्यात उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीत येईल का, या प्रश्नालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं. 'मधल्या काळात प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झालेली नाही. आता पुन्हा राजकीय समीकरणं बरीच बदलली आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं काय आहे हे त्यांनी सांगायला हवं. त्यांनी ठोस प्रस्ताव अद्याप दिलेला नाही. ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.