मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : राहुल गांधी यांच्या मदतीला धावले उद्धव ठाकरे; लोकसभेतील भाषणाचं केलं समर्थन

Video : राहुल गांधी यांच्या मदतीला धावले उद्धव ठाकरे; लोकसभेतील भाषणाचं केलं समर्थन

Jul 02, 2024 05:50 PM IST

uddhav thackeray backs rahul gandhi : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहातून निलंबित करण्याचा निर्णय लोकशाही विरोधी आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राहुल गांधी लोकसभेत जे बोलले, ते काही चुकीचं नव्हतं. त्यांनी हिंदुत्वाचा अपमान वगैरे अजिबात केलेला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही एवढंच ते सांगत होते. त्यांच्या या वक्तव्याचा विधान परिषदेच्या कामकाजाशी काहीही संबंध नव्हता. भाजपचे सदस्य तो ठराव आणू पाहत होते. अंबादास दानवे यांनी त्यास विरोध केला होता. तसा ठराव आणायचा असेल तर संसदेत 'जय संविधान' म्हणण्यास आक्षेप घेणाऱ्यांच्याही निषेधाचा ठराव राज्याच्या सभागृहात आणला जायला हवा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला हाणला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp