Uddhav Thackeray Video : आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर करण्याची हल्ली फॅशन झाली आहे. इतक्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर सातही जन्म स्वर्ग मिळाला असता असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उद्देशून संसदेत केलं होतं. त्यावरून सध्या देशभर गदारोळ उठला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अमित शहा, भाजप व आरएसएसवर हल्ला चढवला. 'आरएसएस, भाजपनं सांगितल्याशिवाय अमित शहा हे डॉ. आंबेडकर यांच्याविषयी असं बोलूच शकत नाही. आंबडेकरांना छळणारी मनोवृत्ती आजही कायम आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यामुळं भाजपचा बुरखा फाटला आहे, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.