नागपूरमधील कळमेश्वर इथं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २९ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मोदी आणि शहा हे आम्हाला संपवण्याची भाषा करतायत, पण त्यांना हे माहीत नाही की उद्धव ठाकरे म्हणजे एक व्यक्ती नाही. तर राज्यातील जनता म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत. त्यामुळं आम्हाला कुणीही दिल्लीवाला संपवू शकत नाही, ही जनताच आम्हाला संपवू शकते, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.