मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : आई-बहिणींना शिवीगाळ करणारे लोक सरकारमध्ये मंत्री कसे?; कोणाबद्दल असं बोलले उद्धव ठाकरे?

video : आई-बहिणींना शिवीगाळ करणारे लोक सरकारमध्ये मंत्री कसे?; कोणाबद्दल असं बोलले उद्धव ठाकरे?

Jun 27, 2024 06:29 PM IST

Uddhav Thackeray video : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्न मांडले. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हे महायुतीचं सरकार म्हणजे महागळती सरकार आहे. प्रत्येक ठिकाणी काहीतरी घोळ आणि गळती सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारची खिल्ली उडवली. राज्य सरकारमधील एक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी महिला उमेदवारावर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. त्यांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. असा माणूस राज्यात मंत्री आहे हे पाहून अंगावर शहारा येतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp