Uddhav Thackeray on ‘माणसाच्या मृत्यूची तुलना कुत्र्याच्या मृत्यूशी तुलना करणारा गृहमंत्री मनोरुग्णच असला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांची मानसिक तपासणी केली पाहिजे,’ अशी जळजळीत टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या आणि त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर ते बोलत होते.