Uddhav Thackeray speech at MVA rally in Sambhaji Nagar : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगर इथं झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाच्या हिंदुत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मुलाबाळांना नाहक त्रास देणं, महिलांबद्दल अश्लाघ्य बोलणं हे तुमचं हिंदुत्व आहे? कशाला छत्रपतींचं नाव घेता? मोदी आणि अमित शहांचं नाव घेत असाल तर तुम्ही असंच वागणार, पण तुम्हाला फुले, शाहू, आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सत्ताधारी भाजप व शिंदे गटाला ठणकावलं.