Uddhav Thackeray Speech Video : नाशिकमध्ये आज झालेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिवेशनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. रामाचे मुखवटे घालून रावण सध्या फिरत आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी गोविंदगिरी नामक महाराजांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपचा व त्यांच्या समर्थकाचा समाचार घेतला. प्रभू रामचंद्र ही कोणा एकाची मालमत्ता नाही. तुम्ही तसंच करायला निघाला असाल तर आम्हालाही भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.