Uddhav Thackeray Video : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सभागृहातून निलंबित करण्याच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार टीका केली. अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली असा आक्षेप त्यांच्याबद्दल असेल तर मी महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींची माफी मागतो. मात्र, भाजपचे सुधीर मुनगंटीवार पंतप्रधानांच्या समोर जाहीर सभेत भावा-बहिणीच्या नात्याबद्दल अभद्र बोलतात. अब्दुल सत्तार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करतात आणि ज्याला एका तरुणीच्या प्रकरणात मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर पुन्हा घेतलं जातं. त्यांच्याबद्दल भाजपची भूमिका काय आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.