Uddhav Thackeray On Hindutva : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं २३ जानेवारी २०२५ रोजी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा मुंबईतील अंधेरी इथं पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपचा जोरदार समाचार घेतला. मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली म्हणून भाजपचा पोटशूळ उठला आहे. पण आम्ही देशप्रेमी मुस्लिमांना कायम आमचे मानतो, म्हणूनच ते आम्हाला मतदान करतात. आमचं हिंदुत्वही त्यांना मान्य आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणता आणि मुस्लिमांबद्दल तुम्हाला इतका द्वेष वाटत असेल तर मग आधी भाजपच्या झेंड्यातला हिरवा रंग काढून दाखवा. मग आम्हाला हिंदुत्व शिकवा, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.