Devendra fadnavis on Toyota Kirloskar Investment : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीनं २० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा करार राज्य सरकारसोबत झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुंतवणुकीचं स्वागत केलं आहे. महाराष्ट्राला ऑटोमोबाईल क्षेत्रात एक पाऊल पुढं घेऊन जाणारा हा करार आहे. या गुंतवणुकीमुळं प्रत्यक्ष ८ हजार आणि अप्रत्यक्ष १२ हजार संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळं मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.