Tirupati Stampede Video : तिरुपती बालाजी मंदिरात ८ जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत किमान ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. ही घटना तिरुमला श्रीवारी वैकुंठ द्वारा तिकीट काउंटरजवळील विष्णू निवासमजवळ 'दर्शन' टोकन वितरणाच्या वेळी घडली. देशाच्या अनेक भागातून भाविक टोकन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत होते. त्यामुळं सर्व केंद्रांवर मोठी गर्दी झाली आणि त्यातूनच ही चेंगराचेंगरी झाली.