video : ...म्हणून मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  video : ...म्हणून मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण

video : ...म्हणून मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण

Jul 16, 2024 09:49 PM IST

Prakash Ambedkar on Maratha Reservation : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्यात आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली. मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद अधिक चिघळू नये अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीबाबत राजकीय पक्षांची भूमिका काय आहे हे समजणं गरजेचं आहे. मात्र, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत तोडगा निघणार नाही. या पक्षांना भूमिका मांडण्यास भाग पाडण्यासाठी व वंचितांच्या इतर मागण्यांसाठी आम्ही राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा काढणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp