BSF Jawan singing Sandese aate hai: १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला 'बॉर्डर' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ अशा दिग्गजांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. भारत-पाकिस्तानमधील युद्धावर आधारलेल्या या चित्रपटातील गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. आजही ही गाणी लोकांच्या ओठांवर आहेत. त्यातही 'संदेसे आते है' हे गाणं म्हणजे लष्करातील जवानांच्या मनातील हळवा कोपरा. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानानं गायलेलं हेच गाणं सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालं आहे.