Raj Thackeray Video : मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात उभं राहिलेलं भारतीय क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं अनावरण ३ डिसेंबर रोजी झालं. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. 'खरंतर इतक्या मोठ्या माणसाचं स्मारक याआधीच उभं रहायला हवं होतं. पण कुठल्याही अधिकृत गोष्टीला आपल्याकडे इतक्या परवानग्या आणि त्यासाठी खूप वेळ जातो, असा टोला राज ठाकरे यांनी हाणला. आपल्याकडे स्मारक म्हणलं की फक्त पुतळा असं एक समीकरणच झालं आहे, पण आचरेकर सरांचं स्मारक हे वेगळं असावं, त्यात पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळावी असं काहीतरी असावं असं माझं मत होतं. त्यानुसार सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हे स्मारक उभारलं आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी हे देखील यावेळी उपस्थित होते.