Revanth Reddy in worli : तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळी विधानसभेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी वरळीत एकत्रित रोड शो केला. या रोड शोला मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्राची विधानसभा जिंकण्यासाठी सत्ताधारी महायुती व विरोधकांची महाविकास आघाडी जंगजंग पछाडत आहेत. देशभरातून नेते, मंत्री आणि मुख्यमंत्री येऊन प्रचार करत आहेत. काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात रोड शो केला.