Sushma Andhare Dasara melava Speech Video : छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवारी, २४ ऑक्टोबर रोजी पार पडला. शिवसेनेची बुलंद तोफ अशी ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत मेळाव्याला संबोधित केलं. सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणातून राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. 'देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नासवला. ते अजिबात चाणक्य वगैरे नाहीत. त्यांनी कुणालाही घडवलं नाही. त्यांनी फक्त जमवलं आणि चांगल्या नेत्यांना संपवलं,' अशी जहरी टीका अंधारे यांनी यावेळी केली.