Sushma Andhare Speech Video : नाशिकमध्ये आज झालेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अधिवेशनात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. श्रीराम एकवचनी होते, पण मोदी साहेब ७० हजार कोटींचे आरोप ७२ तासांत विसरून जातात आणि त्यांना भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतात. कसले हे नेते,' असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. महिलांच्या नावानं गळे काढणारे ह्यांचे नेते आपल्या पत्नीला सर्व अधिकार देतात का, असा अप्रत्यक्ष सवालही सुषमा अंधारे यांनी केला.