Sushma Andhare attacks CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ट्वीट करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या व्यक्तिगत टीकेला शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. स्वत:च्या कुटुंबापुरता विचार करणारे असं म्हणत शिंदे यांनी काल उद्धव यांना लक्ष्य केलं होतं. त्या टीकेचा समाचार घेताना सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांचे अध्यात्मिक गुरू नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कुटुंबाकडं बोट दाखवलं आहे. मुख्यमंत्री साहेब सर्वसामान्यांचा इतका विचार करत असतील तर ठाण्यात बाकीचे सगळे निर्बुद्ध, नालायक आणि मूर्ख आहेत का? कुणाचीच खासदार होण्याची लायकी नाही का? मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव राजकारणासाठी सक्षम आहे का?, असे प्रश्नही अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.