Sunil Prabhu on Kalyan Marathi Family assault : कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स या सोसायटीत एका धनदांडग्या परप्रांतीयाकडून मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. ठाकरेंच्या शिवसेनेनं हा मुद्दा सभागृहात उचलला. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. ‘या प्रकरणातील दोषी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला सोडणार नाही,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.