मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : जाहीर कार्यक्रमात सोनू निगमने आशा भोसले यांचे पाय गुलाब पाण्याने धुतले!

Video : जाहीर कार्यक्रमात सोनू निगमने आशा भोसले यांचे पाय गुलाब पाण्याने धुतले!

Jun 29, 2024 12:04 PM IST

Asha Bhosle Biography launch Ceremony Video : सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जीवनावरील 'स्वरस्वामिनी आशा' या आत्मचरित्रपर पुस्तकाचं लोकार्पण नुकतंच मुंबईत झालं. या पुस्तकात आशाताईंबद्दल ९० मान्यवरांनी लेख लिहिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी गायक सोनू निगम यानं आशाताईंबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे पाय गुलाब पाण्यानं धुतले. या सोहळ्यात आशा भोसले व हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या सांगितीक व वैयक्तिक आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp