मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : विरोधकांच्या बैठकीची जय्यत तयारी, नेते बेंगळुरूत पोहोचले!

Video : विरोधकांच्या बैठकीची जय्यत तयारी, नेते बेंगळुरूत पोहोचले!

Jul 17, 2023 07:02 PM IST Ganesh Pandurang Kadam
Jul 17, 2023 07:02 PM IST

Opposition Meet bengaluru : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारपुढं आव्हान उभं करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. मोदी सरकार विरोधकांचा आवाज दाबून राज्यघटना पायदळी तुडवत असल्याचा त्यांचा आरोप आहे. लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, असं विरोधकांचं मत बनलं आहे. त्यातूनच राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या एकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विरोधकांच्या एकजुटीचं पहिलं दर्शन पाटण्यात झालं होतं. आता पुढील बैठक १८ जुलै रोजी बेंगळुरू इथं होत आहे. त्यासाठी अनेक नेते बेंगळुरूत पोहोचले आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यांचं बेंगळुरूत स्वागत केलं.

More