Indian Army struggle Video : देशाच्या सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांना शत्रूंपर्यंत पोहोचण्याआधी निसर्गाच्या लहरीपणाचा व नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. 'सदैव सैनिका पुढेच जायचे...' हे ब्रीद मनाशी बाळगून सैनिक संघर्ष करत आपली वाट काढत असतात. कमरेपर्यंत असलेल्या बर्फाच्या ढिगाऱ्यातून मार्ग काढणाऱ्या भारतीय सैनिकाचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. प्रत्येक भारतीयानं कडकडीत सॅल्यूट ठोकावासा वाटेल, असाच हा क्षण आहे.