Sanjay Raut Reaction on Modi Speech : स्वातंत्र्याच्या ७८ व्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केलं. पंतप्रधानांच्या या भाषणावर शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात, त्या विचारधारेत तिरंग्याला स्थानच नाही. देश स्वतंत्र झाल्यानंतरही ५६ वर्षे त्यांनी तिरंगा फडकावला नव्हता. पण पंतप्रधान म्हणून त्यांना ते करावं लागत आहे. मात्र हे ध्वजारोहण अल्पमतातल्या पंतप्रधानांचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.