Sanjay Raut Dasara Melava Speech : ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांचं खणखणीत भाषण झालं. संजय राऊत यांनी यावेळी शिंदे सेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवतीर्थावरील दसरा मेळावा हा निष्ठावंतांचा मेळावा आहे. आझाद मैदानात गद्दारांचा मेळावा आहे. ही देवाची आळंदी आहे. आझाद मैदानावर चोरांची आळंदी आहे. मोदींचे गुलाम आझाद मैदानात मेळावा घेतायत. आझाद मैदानात गुलामांचा मेळावा कसा होऊ शकतो, असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतच्या गर्भातून झालेला आहे. त्यांनी सुरतमध्ये मेळावा घ्यायला हवा, असं राऊत यांनी सुनावलं.