Sanjay Raut Video : संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका न घेतल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर निदर्शने करणारे मुस्लिम नागरिक हे सुपारी घेऊन आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते समर्थक होते, असा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. ते आज पत्रकारांशी बोलत होते. राऊत यांनी यावेळी निदर्शनं करणाऱ्या सर्व लोकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसे संबंध आहेत याचा पुरावा म्हणून पत्रकारांना निदर्शकांचे एकनाथ शिंदेंसोबतचे फोटो दाखवले.